Ad will apear here
Next
उत्कृष्ट फुटबॉलपटू घडवणारा परेश...

फुटबॉलमध्ये परेश शिवलकर हे नाव केवळ पुण्यातच नाही, तर राज्य पातळीवरदेखील आता नवीन राहिलेले नाही. एक फुटबॉलपटू म्हणून जितकी अविस्मरणीय कारकीर्द त्याने गाजवली आहे, तेवढाच आज एक प्रशिक्षक म्हणून तो यशस्वी ठरत आहे... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक परेश शिवलकरबद्दल...
................
पुण्यातील फुटबॉलपटू परेश शिवलकर हा एक मेहनती खेळाडू आहे. आज तो या क्षेत्रात प्रशिक्षक म्हणून कार्यरत असला, तरी एक खेळाडू म्हणूनही त्याने आपली कारकीर्द सुरू ठेवली आहे, जेणेकरून खेळातील नवनवीन संकल्पना व डावपेच नव्या खेळाडूंपर्यंत पोहोचवता येतील. अशा नवीन संकल्पना तो त्याच्या अकादमीच्या माध्यमातून खेळाडूंना शिकवतो. 

टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत वयाच्या दहाव्या वर्षी परेशने फुटबॉल खेळायला सुरुवात केली. ‘स्कायहॉक’ या संघाकडून तो पुण्यातील स्थानिक, तसेच व्यावसायिक स्पर्धांमध्ये खेळू लागला. पुढे १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघात त्याची निवड झाली आणि त्याच्या कारकिर्दीला एक नवीन वळण मिळाले. जिल्हा परिषद, महापालिका, पुणे जिल्हा फुटबॉल संघटना आणि राज्य स्तरावरील संघटना यांनी आयोजित केलेल्या सर्व स्पर्धांमध्ये त्याने आपला ठसा उमटवला. कधी डिफेंडर म्हणून, तर कधी अटॅकर म्हणून त्याने संघासाठी सातत्याने सरस कामगिरी केली. त्याची ही गुणवत्ता पाहून, पुणे सिटी फुटबॉल क्लब आणि बेंगळुरू फुटबॉल क्लब यांनी त्याला खेळाडू म्हणून करारबद्ध केले. पुढे काही काळातच त्यांनी परेशवर प्रशिक्षकपदाचीही जबाबदारी सोपवली. 

परेश शिवलकरपरेशने तीन वेळा महाराष्ट्राचे नेतृत्व केले. या तिन्ही वेळा त्याने वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत राज्याला उपविजेतेपद मिळवून दिले. ‘डुरँड’ करंडकासाठीदेखील करारपात्र खेळाडू म्हणून पुढे त्याची निवड झाली. या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर त्याची भारतीय संघाच्या सराव शिबिरासाठी निवड झाली; मात्र  भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे त्याचे स्वप्न त्या वेळी पूर्ण झाले नाही. परंतु त्यानंतर झालेल्या रिलायन्स अखिल भारतीय स्पर्धेत त्याने आपला ठसा उमटवला. या स्पर्धेत भारतीय संघाचा स्टार खेळाडू सुनील छेत्री हादेखील होता; मात्र तरीही टॉप स्कोअरर हा किताब परेशलाच मिळाला. 

परेशच्या आजवरच्या वाटचालीत त्याचे दोन्ही भाऊ आणि त्याची पत्नी यांनी त्याला सातत्याने पाठिंबा दिल्याचे परेश सांगतो. ‘एअर इंडिया’ची सरकारी नोकरी सोडून त्याने ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ची नोकरी पत्करली. या त्याच्या निर्णयाला त्याच्या पत्नीने ठाम पाठिंबा दिला. ही नोकरी करत असतानाच तो व्यावसायिक फुटबॉल स्पर्धाही खेळत होता आणि दुसरीकडे स्वतःच्या अकादमीचे स्वप्नही पूर्ण करत होता.  

मुंबईमध्ये ‘गल्फ ऑइल’कडून खेळत असताना त्याने स्वतःची अकादमी सुरू केली. आज या अकादमीत अनेक खेळाडू फुटबॉलमधील कौशल्य शिकण्यासाठी येत आहेत. याच अकादमीने राज्याला अनेक खेळाडूदेखील दिले आहेत. स्थानिक स्पर्धांमध्ये त्याच्या अकादमीमार्फत कित्येक खेळाडू आज आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत. केवळ ‘पुणे सिटी फुटबॉल क्लब’ एवढीच त्याच्या अकादमीची मर्यादा नसून, येत्या काळात देशाला सर्वोत्तम खेळाडू देण्याचे परेशचे स्वप्न आहे. रोहन फासगे हा त्याच्या अकादमीचा खेळाडू आज राष्ट्रीय स्तरावर आहे. तो अखिल भारतीय वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा खेळला. त्याचबरोबर शिवम पेडणेकर आणि विकी राजपूत हे दोघेही जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सध्या खेळत आहेत. 

या अकादमीला आज केवळ तीन वर्षे होत आहेत. इतक्या कमी काळात पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे आयोजित स्पर्धेत या अकादमीचे जवळपास चाळीस खेळाडू वरिष्ठ गटात खेळत आहेत. यंदापासून अकादमीतर्फे ज्युनिअर गटासाठीदेखील नोंदणी करण्यात येणार असून, विविध संघांत जवळपास ३० ते ३५ खेळाडू संघटनेचे खेळाडू म्हणून खेळतील. खूप लहान वयात एक खेळाडू आणि प्रशिक्षक अशी दुहेरी जबाबदारी संभाळणारा परेश शिवलकर हा महाराष्ट्राचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. राज्याला आणि पर्यायाने देशाला आपल्या अकादमीतून खेळाडू देण्याचे ध्येय त्याने ठेवले आहे. ‘इंडियन सुपर लीग फुटबॉल’ हे त्याचे पहिले उद्दिष्ट असून या स्पर्धेत अकादमीतर्फे जास्तीत जास्त खेळाडू सहभागी झाले, तर पुढे जाऊन याच खेळाडूंना भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. परेशचे हे स्वप्न पूर्ण झाले, तर देशाला फुटबॉलमधील भविष्य ठरतील असे खेळाडू मिळतील यात शंका नाही. 

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZKGBU
Similar Posts
ऋतुजा आणि राधिकाला करायचे आहे देशाचे प्रतिनिधित्व ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील ‘क्रीडारत्ने’ या साप्ताहिक सदराच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात विविध खेळांतील नव्या-जुन्या सुमारे ५० खेळाडूंची माहिती प्रसिद्ध करण्यात आली. खेळाडूंचे वैयक्तिक आयुष्य, त्यांची कामगिरी, त्यांच्या अडचणी, त्यातून त्यांनी मिळवलेले यश या सगळ्या गोष्टींचा आढावा यातून घेण्यात आला. या सदराचा आज समारोप करत आहोत
चौसष्ठ घरांचा नवा राजा ग्रँडमास्टर होण्याचे स्वप्न बुद्धिबळातला प्रत्येक खेळाडू पाहतो; मात्र त्यात खूप कमी जण यशस्वी होताना दिसतात. पुण्याचा अभिमन्यू पुराणिक याने आपले हे स्वप्न पूर्ण करून महाराष्ट्राचा सातवा, तर पुण्याचा तिसरा ग्रँडमास्टर होण्याचा बहुमान मिळवला... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या बुद्धिबळपटू अभिमन्यू पुराणिकबद्दल
वेगाची नवी राणी : ताई बामणे नाशिकची नवोदित धावपटू ताई बामणे हिने युवा ऑलिंपिकला पात्र ठरत भारताची नवी वेगाची राणी होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. अर्जेंटिनामध्ये होणाऱ्या युवा ऑलिंपिक स्पर्धेसाठी ती पात्र ठरली असून बँकॉक येथे झालेल्या पात्रता फेरीत तिने पंधराशे मीटर अंतराच्या शर्यतीत रौप्य पदक पटकावले आणि युवा ऑलिंपिकची पात्रता मिळवली
वयावर मात करत खेळणारा नितीन टेनिसमधील इंडियन एक्स्प्रेस म्हणून ओळखले जाणारे लिअँडर पेस आणि महेश भूपती यांच्याच काळात आणखी एक खेळाडू भारतात नावारूपाला आला, तो म्हणजे नितीन कीर्तने. प्रशिक्षक म्हणून काम करत असताना वयावर मात करत नितीन एक खेळाडू म्हणूनही सातत्याने विविध स्पर्धेत यशस्वी होत आहे.... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या टेनिसपटू-प्रशिक्षक ‘नितीन कीर्तने’बद्दल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language